Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले वाचा...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला एकनाथ शिंदे सरकार सामोरं गेलं. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मतं पडली. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केल्याची घोषणा केला. (Devendra Fadnavis Latest News)

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. 'या सभागृहाने शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला. त्यांचं मी अभिनंदन करतो'. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. तसेच

'ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं, त्यांचे आभार मानतोच, शिवाय अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांचेही आभार, त्या अदृश्य हातांचेही मनापासून आभार' असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Eknath Shinde News)

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मी तेव्हा कविता केली होती मी पुन्हा येईन... पण तेव्हा माझी काही जणांनी टिंगल टवाळी केली. बघा मी पुन्हा आलो... पण मी यावेळी एकटाच नाही तर, एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो. आता मी माझी टिंगल टवाळी करणाऱ्यांचा बदला घेणार. बदला घेणार म्हणजे त्यांना माफ करणार' अशी फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. कुणी आंदोलन करत आहे म्हणून ते आपले विरोधक आहेत असे मानने योग्य नाही. आंदोलक कधी आक्रमक झाले तर कारवाई करावी लागते. पण आमच्याविरुद्ध एक शब्द बोललात, एक पोस्ट लिहीली तर आम्ही ऐकून घेणार नाही. आमच्याविरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली. पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे तो ऐकून घेतला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिकला भारतीय संघात का घेतलं? समोर आलं मोठं कारण

Manjra Dam : मांजरा धरणात आता १० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; अनेक भागात मोठ पाणीसंकट

UBT Vs INC : मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अनिल देसाईंना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला विरोध?

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका, १८ मे रोजी मुंबईत होणार ४ सभा

PM Modi Rally: महायुतीच्या प्रचारसभेत तरुण शेतकरी आक्रमक; कांद्यावर बोला शेतकऱ्यांच्या घोषणा

SCROLL FOR NEXT