Maharashtra Agriculture Minister Datta Bharane assures farmers of crop loss compensation before Diwali. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी केली घोषणा, म्हणाले दिवाळीआधी सर्वांना नुकसान भरपाई

Maharashtra Agriculture Minister Datta Bharane : पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारकडून भरपाई मिळणार आहे. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी याबाबत घोषणा केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Maharashtra Farmers to Get Compensation Before Diwali, Assures Agriculture Minister : पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकसान झालेल्या भागात सध्या वेगात पंचनामे केले जात आहेत. ज्याचे ज्याचे नुकसान झाले आहेत, शेती पिकाचे असो किंवा मातीचे नुकसान सगळ्यांना सरकार भरपाई देणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही निकष आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

पावसाने झोडपल्यामुळे उभी पिके पाण्यात गेली. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतामधील स्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. मराठवाड्यात याचा सर्वाधिक फटका बसला होता. बीड, संभाजीनगर, जालना, परभणी अन् नांदेडमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्याशिवाय सोलापूर, पुण्यामध्येही पावसाने रौद्र रूप घेतलं होतं. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिवाळीआधीच शेतकऱ्यांचे तोंड कडू झालेले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही वारंवार केली जात आहे. आता सरकारने मोठं पाऊल उचलले असून दिवाळीच्या आधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.

मे २०२५ पासून सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. निसर्गाचे संकट आले आहे, त्याला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. शेती पिकाचे नुकसान वाढत आहे. ६०,६५ हजार हेक्टर वरून ते अजून वाढत चाललं आहे. हवामान बदलाचा विषय आहे, सरारीपेक्षा एकाच दिवशी मोठा पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतं आहे. पण त्याववर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे. सर्व ठिकाणाच्या शेतीच्याबाबतचे पंचनामे सुरू आहेत, असे भरणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रुद्रेश्वर लेणी डोंगरावरील दरड कोसळली

Shocking: स्टाईलमध्ये कोब्रा पकडला अन् दातात धरून स्टंट केला, पण... कॉन्स्टेबलचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO

Dharashiv Flood : धाराशिवमध्ये पावसाचा उद्रेक, २०० जण पूराच्या पाण्यात अडकले; हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू|VIDEO

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; विरेगाव येथे पुराच्या पाण्यात शेतकरी शेतातच अडकले, मदतीसाठी बचाव पथक रवाना

Viral Video: 'तू लगावे जब लिपिस्टिक!' दुबईत आशिया कपमध्ये भोजपुरीचा धमाका!पाकड्यांसमोर भारतीय चाहत्यांचा डान्स व्हायरल झाला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT