Anganwadi workers, Eknath Shinde And Devendra Fadnavis
Anganwadi workers, Eknath Shinde And Devendra Fadnavis SAAM TV
मुंबई/पुणे

Anganwadi workers News : २, २०, ००० अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचं नववर्षाचं मोठं गिफ्ट

सूरज सावंत

Anganwadi Sevika News Update : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं २ लाख २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नववर्षाची मोठी भेट दिली आहे. पोषण ट्रॅकर अॅपसाठी नवे मोबाइल दिले जाणार आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मानधनातही १० टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात २६ जानेवारीपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज, गुरुवार 12 जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून नववर्षाची भेट दिली जाणार आहे. पोषण ट्रॅकर अॅपसाठी त्यांना नवे मोबाइल दिले जाणार आहेत. राज्य सरकार १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

या बैठकीबाबत मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली. खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाली. मानधन वाढ, मोबाइल दुरुस्ती, स्मार्ट बालवाडी या विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी मागण्या ऐकून घेतल्या. सरकार सकारात्मक आणि सहानुभूतीने विचार करेल. २६ जानेवारीपर्यंत निर्णयासंदर्भात आदेश देण्यात येतील. आताही गोड बातमी देणार असल्याचे संकेत लोढा यांनी दिले.

शिंदे-फडणवीसांचे आश्वासन

राज्यातील अंगणवाडीसाठीच्या जागांबाबतही लोढा यांनी माहिती दिली. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यात २० हजार खोल्या या रिक्त आहेत. त्या खोल्या अंगणवाड्यांसाठी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे लोढा यांनी सांगितले.

...तर देशभरात आंदोलन करू

अखिल भारतीय अंगणवाडी संघाच्या सचिव वनिता सावंत यांनी यावेळी माहिती दिली. अनेक दिवसांचा जो प्रश्न प्रलंबित होता, त्यावर तोडगा निघाला आहे. मंत्रिमहोदयांनी आम्हाला जवळपास एक तास दिला. आम्हाला शासकीय नोकरीत समावून घ्यावे, वयोमर्यादा ४५ वर्षे होती, ती ५५ वर्षे करण्यासह आमच्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, पण मागण्या पूर्ण न झाल्यास देशभरात आंदोलन करू, असा इशारा वनिता सावंत यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

Special Report : किरण सामंत नॉट रिचेबल! राणेंचं टेंशन वाढवणार?

Special Report | बारामतीत सुप्रिया सुळेंची गांधीगिरी! सुळेंनी गाठलं थेट अजितदादांचं घर

Special Report : मेरे पास माॅं है! अजित पवार सख्या भावाला असं का बोलले?

SCROLL FOR NEXT