Maharashtra Dry Day News  Ai image
मुंबई/पुणे

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra Dry Day News : २ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ड्राय डे लागू राहणार आहे. वाईन शॉप, बीअर शॉपी, देशी दारू दुकाने आणि परमिट रूम्ससाठी मद्यविक्री बंदी.

Alisha Khedekar

  • २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ड्राय डे लागू

  • वाईन शॉप्स, बीअर शॉपी आणि देशी दारूच्या दुकानांना मद्यविक्री बंद

  • ड्राय डेचा उद्देश कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्यास मदत करणे

तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती असल्याने महाराष्ट्रात मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक वाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने तसेच मद्यविक्रीची परवानगी असलेल्या हॉटेलमधील परमिट रूम्सना ड्राय डेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

महाराष्ट्रात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यासाठी काही दिवस कायद्यानुसार निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट, १९४९ अंतर्गत परवानाधारक मद्यविक्रीची ठिकाणे विशिष्ट दिवशी बंद ठेवण्याची तरतूद आहे. गांधी जयंती हा त्यापैकी एक महत्त्वाचा दिवस आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये २ ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि २० ऑक्टोबर (दसरा/विजयादशमी) या दिवशी मद्यविक्रीवर बंदी राहण्याची नोंद आहे.

का लागू केला जातो ड्राय डे?

ड्राय डेचा मुख्य उद्देश संबंधित राष्ट्रीय, धार्मिक किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या दिवसांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे, मद्यविक्रीमुळे उद्भवणारे अनुचित प्रकार टाळणे आणि प्रशासनाला गर्दीच्या काळात परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे हा आहे.

त्यामुळे २ ऑक्टोबरला मद्यविक्री बंद राहणार असल्याने तळीरामांनी याची नोंद घ्यावी. तसेच दसऱ्याच्या दिवशी लागू असलेल्या स्थानिक आदेशांची माहिती संबंधित जिल्हाधिकारी किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत धडक; आंदोलनाचा इशारा

Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT