ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! अजित पवारांना कोरोनाची लागण

राज्यात सत्तासंघर्ष असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. अजित पवारांनी ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. अजित पवारांची (Ajit Pawar) सध्या प्रकृती चांगली असून ते डॉक्टारांचा सल्ला घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. ( Ajit Pawar Latest News )

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आज सोमवारी पवारांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. तसेच संपर्कात असलेल्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला देखील पवारांनी दिला आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अजित पवारांनी ट्विट करून सदर माहिती दिली आहे. ट्विट करत अजित पवार म्हणाले, 'काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी'.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र काही वेळेनंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्टमध्ये त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काल रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे. राज्यपालांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता ते राजकीय घडमोडीत काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

Heart attack risk: तुम्ही पूर्णपणे फिट आहात असं वाटतंय? पहिल्या हार्ट अटॅकपूर्वी शरीरात लपलेले 'हे' 4 धोके ओळखा

क्रूरतेची सीमा ओलांडली! राजधानीत अल्पवयीन मुलांनी रचला भयंकर कट; तरुणीसोबत नको ते केलं अन्...

Diabetes च्या रुग्णांसाठी 'हा' चहा ठरतो वरदान, सकाळी १ कप प्यायल्याने दिवसभर शुगर राहील कंट्रोलमध्ये

Bigg Boss 20: काजी तौकीरच्या 'त्या' डबल मीनिंग वक्तव्यावरून 'बिग बॉस 20'मध्ये राडा; प्रेक्षकांनीही व्यक्त केला संताप

SCROLL FOR NEXT