राज्यात कडक निर्बंध लागू Saam Tv
मुंबई/पुणे

Lockdown Update | राज्यात कडक निर्बंध लागू, पाहा नियम काय?

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहे. त्यानुसार, आता अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्टींवर विरजण पडलं आहे. काय आहेत ते निर्बंध पाहुया - (Maharashtra Corona Update Strict Restrictions imposed in state due to increase in the number of corona patients)

असे असतील नियम -

🔶 लग्न समारंभ हे बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेत असो, उपस्थितांची कमाल संख्या ही 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

🔷 कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो. तो बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेत असो, उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

🔶 अंतिम संस्काराला जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

🔷 राज्याच्या कोणत्याही भागातील पर्यटन स्थळे, गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे जसे की मोकळी मैदान, इत्यादी ठिकाणी कलम 144 लागू असेल.

🔶 कोरोनाबाबतचे आधीचे निर्बंधही कायम राहातील.

आज राज्यात किती रुग्ण वाढले?

महाराष्ट्रात आज दिवसभरात 5,368 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या आकड्याच कालच्या संख्येपेक्षा 1,468 ने वाढ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66,70,754 झाली आहे. तर दिवसभरात 1,193 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 22 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात 18,217 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.55% एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1,33,748 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1, 078 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिरक्रॉनचे (Omicron) 198 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे, ही एक चिंतेची बाब आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सची (Covid19 task force) बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तर अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT