eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला आमदारांना घेऊन जाणार

शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असून दौऱ्याची तारीख ठरली आहे.

सुरज सावंत

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असून दौऱ्याची तारीख ठरली आहे. २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा (Eknath Shinde) हा एक दिवसीय दौरा आहे. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे.

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत असल्याचे बोलले जात आहे. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून २५ लाखांचा हप्ता? शिवसेना शहरप्रमुखांचा KDMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: घरगुती एलपीजी सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर; कोपरगावात पुरवठा विभागाची मोठी कारवाई, 19 सिलिंडर जप्त

Fansachi Sukhi Rhaji Recipe : कोकणी मेजवानी! कोवळ्या फणसाची सुकी भाजी कधी खाल्लीय का? एकदा चव चाखाल तर खातच राहाल

Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

Chanakya Niti: दिसायला भोळे पण प्रत्यक्षात खूप चतूर असणारे मित्र कसे ओळखायचे? वाचा चाणक्य निती

SCROLL FOR NEXT