Cm Eknath Shinde Saamtv
मुंबई/पुणे

Eknath Shinde Ayodhya Visit: एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत; मुख्यमंत्री योगींचीही घेणार भेट, कसा असेल दौरा?

Ayodhya News : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे.

Shivani Tichkule

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येला जाणार असून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. (Latest Marathi News)

तयारी सुरू

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. 7 आणि 8 एप्रिल रोजी लखनऊ ते अयोध्येपर्यंत शिंदांच्या स्वागतासाठी सुमारे 1500 बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्तेही मोठ्या संख्येने बॅनर, पोस्टर लावण्याच्या तयारीत आहेत.

कसा असेल अयोध्या दौरा?

मुख्यमंत्री शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत पोहोचणार असून रामललाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या कार्यक्रमात रामल्ला यांचे दर्शन, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणे यांचा समावेश आहे. शिवसैनिक 8 एप्रिलपासून अयोध्येत पोहोचणार आहेत तर मुख्यमंत्री शिंदे 9 एप्रिलला अयोध्येला पोहोचणार आहेत. संध्याकाळी शरयू आरती करून ते मुख्यमंत्री मुंबईला परततील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT