Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : रखडलेल्या खातेवाटपाचं गणित जवळपास जुळलं; 'वर्षा'वरील रात्रीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Cabinet Portfolio Delay : शिंदे गटातील ३ ते ४ मंत्र्यांची खाती राष्ट्रवादीकडे जाणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News : राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन १० दिवस उलटले आहे. मात्र सर्व ९ मंत्री खात्यांविनाच आहे. खातेवाटत कधी होणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र खातेवाटपामध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता खातेवाटपाचं गणित जुळलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिंदे गटातील ३ ते ४ मंत्र्यांची खाती राष्ट्रवादीकडे जाणार आहेत. तर भाजपाकडून ५ खाती राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादीला ९ खाती दिल्यानंतर उर्वरीत मंत्रिमंडळ विस्तार होणार, तोपर्यंत नाही.

शिवसेनेचा मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र शिवसेनेचा कोणताही मंत्री राजीनामा देणार नसल्याची माहिती आहे. रात्री वर्षा बंगल्यावर झालेली बैठक जवळपास निर्णायक असल्याचं समजत आहे. (Latest Marathi News)

खातेवाटप कुठे रखडलं?

अजित पवार गटाला वाटाघाटीत ठरलेली खाती मिळत नसल्याने खातेवाटप रखडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपने त्यांना ज्या खात्याबाबत आश्वासन दिले होते ती खाती मिळत नसल्याने अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

अजित पवार गटाला अर्थ , गृह, जलसंपदा ही खाती देण्यास शिंदे गट आणि भाजपकडून विरोध होत आहे. याऐवजी महसूल किंवा ऊर्जा खाते देण्याची तयारी शिंदे आणि भाजपने दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT