Maharashtra Cabinet Expansion Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion News: खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? सर्वांनाच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं

खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? सर्वांनाच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं

साम टिव्ही ब्युरो

Sunil Tatkare On Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यामध्ये ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना अद्याप खातेवाटपही झालं नाही.

यातच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठकही पार पडल्या. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी गेला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबई विमानतळावरून आता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. याचदरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी याशी संबंधित एक मोठी माहिती दिली आहे.

काय म्हणाले तटकरे?

पत्रकारांशी संवाद साधत खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, ''उद्या संध्याकाळपर्यंत खाते वाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा प्रश्न निकालात निघाल्याचे आपल्याला कळेल. आमच्यात व्यवस्थित चर्चा सुरू आहे.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार दिल्लीला गेले नव्हते. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीला जात आहेत.'' रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरु असलेल्या वादावर ते म्हणाले की, ''यावरून कुटलाही वाद नाही. आम्ही रायगड पालकमंत्री पदासाठी कधीही आग्रही नव्हतो.''

काही तासानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल : मंत्री उदय सामंत

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ''मी आजही सांगतो, काही तासानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण ते किती तासात होणार, ते सांगू शकत नाही. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर करण्यात येईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

उष्माघातामुळे 7 जणांचा बळी, महाराष्ट्राने गाठला तापमानाचा नवा उच्चांक

Tuesday Horoscope: कामातले वाद मिटतील, ५ राशींवर गणपती बाप्पा होणार प्रसन्न, हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT