Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: CM शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत वर्षावर तातडीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावर चर्चा होणार?

Maharashtra Government Cabinet Expansion: CM शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत वर्षावर तातडीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावर चर्चा होणार?

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या विषयांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यातील कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? अशा सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने अनेकांचं मंत्रिपदाचं स्वप्न भंगणार आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोवले यांनी उघड नाराजी ही व्यक्त केली होती.

त्यांनी सुनील तटकरे यांची कन्या आदिती यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदी उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेसाठी राखीव असल्याचा त्यांचा दावा आहे. यातच त्यांच्या गळ्यात यंदाच्या विस्तारात मंत्रिपदाची माळ पडणार का हेही लवकरच कळेल.

अनेकांचे कोट शिवून तयार आहेत : नितीन गडकरी

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भाष्य केलं आहे. मागील आठवड्यात (६ जुलै) ते म्हणाले की, ''जे नगरसेवक आहेत, त्यांना वाटते आपण आमदार झालो पाहिजे. जे आमदार आहेत, त्यांना मंत्री झालो पाहिजे असे वाटते. जे मंत्री झाले त्यांना चांगले खाते मिळाले पाहिजे असं वाटत असतं. पण आता जे मंत्री होणार होते त्यांना वाटते की आपण मंत्री होणार की नाही. ते कोट शिवून तयार आहेत. मात्र मंत्रिमंडळात संख्या नाही वाढवता येत नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT