Bacchu kadu  Saam Tv
मुंबई/पुणे

...तर वेगळा विचार करू; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सूचक इशारा

अपक्ष आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा (Eknath Shinde) मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटातील ९ तर भाजपच्या ९ आमदारांचा समावेश होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू (Bacchu Kadu) नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. (Mla Bacchu Kadu Latest News)

काय म्हणाले बच्चू कडू?

'मी एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त मंत्रिपदासाठी पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे मी पाठिंबा दिला होता', जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करू,' असा सूचक इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती असंही बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, नाराज असलेल्या चर्चेवरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली. 'नाराज आहे असं नाही, थोडीफार नाराजी असतेच, पण नाराजी इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही फक्त क्षणिक नाराजी आहे, अजून मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार झालेला नाही. जर पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर वेगळी गोष्ट असती' असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. (Bacchu kadu Latest News)

शिंदे सरकारमधील पहिले १८ मंत्री

दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांचा शपथविधी पार पडला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT