Ajit pawar news  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: अजित पवार गटाची दिवाळी गोड होणार; पुढील मंत्रिमंडळ विस्तारात १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदांची लॉटरी

आगमी मंत्रिमंडळात अजित पवार गटाला १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Mumbai Political News:

राज्यात काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात अजित पवार गटाचं 'वर्चस्व' दिसून आलं. त्यानंतर आता पुन्हा राज्य मंत्रिमंडळाच्या उर्वरित विस्तारात अजित पवार गटाला झुकतं माप देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यात अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद, दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

(Latest Marathi News)

राज्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या. यादी जाहीर झाली. त्यात अजित पवारांसह गटाला झुकतं माप दिल्याचं दिसून आलं. यावरून महायुतीत धुसफूस असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेलं पुण्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांना दिलं. तर पुण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे सोलापूरसह दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं.

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या खऱ्या पण, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेलाच होता. पण त्यालाही मुहूर्त सापडला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांमध्ये उत्साह आहे. मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात ८ मंत्रिपदे भाजप स्वतःकडे ठेवू शकतो. तर ६ पदे मित्रपक्षांना दिली जाण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाला एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपदे?

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदासाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच केंद्रात देखील १ कॅबिनेटपद अजित पवार गटाच्या वाट्याला येईल, असं सूत्रांचं म्हणणं आहे. तसं आश्वासन अजित पवार यांना सत्तेत सहभागी होतानाच मिळाल्याची कळतंय.

...आताही विस्तार रखडला तर मुहूर्त कधी?

मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेनंतर देखील रखडल्यास अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तो करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या आगामी मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जातं, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा १५ किंवा १६ ऑक्टोबरला होणार असल्याची चर्चा आहे. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी १० मंत्रिपदे आहेत. तर अजित पवार गटाकडे ९ मंत्रिपदे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT