Narendra Modi and Eknath Shinde
Narendra Modi and Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

PM मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्रातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा; म्हणाले, 'ही उत्तम टीम आहे...'

Jagdish Patil

मुंबई : अनेक धक्कादायक घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने आज (मंगळवार ९ ऑगस्ट) मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. याच पार्श्वभूमिवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या नवनिर्वाचीत मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

याबाबत पंतप्रधानांनी ट्विट केलं असून यामध्ये पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा! असं ट्विट (Tweet) मोदी यांनी केलं आहे.

महत्वाचं म्हणजे मोदींनी हे ट्विट मराठीत केलं आहे. राज्यातील शिंदे सरकार सत्तेवर येण्यामागे भाजपचा मोठा सहभाग आहे. खुद्द एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी देखील ते गुहावाटीमध्ये असताना आपल्या पाठीमागे एका महासत्तेचा हात असल्याचं म्हटलं होतं.

तर विधानसभेत पहिल्याचं भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महाशक्ती म्हणजे भाजपचं असल्याचही जाहीर केलं होते. अशातच आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यामुळे या सरकारला डबल इंजिनची ताकद लागणार आहे. याच पार्श्वभूमिवर आज मोदींनी या मंत्र्याना दिलेल्या मराठीतील शुभेच्छा राज्य सरकारच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्वाच्या असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ -

तब्बल ३९ दिवसांनंतर शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. पहिल्या टप्प्यात आज भाजप आणि शिंदे गटातील एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या नावे खालीलप्रमाणे -

भाजपकडून कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ

गिरीश महाजन

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

सुरेश खाडे

राधाकृष्ण विखे पाटील

अतुल सावे

रवींद्र चव्हाण

विजयकुमार गावित

मंगलप्रभात लोढा

शिंदे गटाकडून कुणी घेतली शपथ

तानाजी सावंत

उदय सामंत

संदीपान भुमरे

दादा भुसे

शंभूराज देसाई

अब्दुल सत्तार

दीपक केसरकर

संजय राठोड

गुलाबराव पाटील

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT