Maharashtra Budget 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Budget 2024: अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार; कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार?

Maharashtra Budget News: येत्या काही महिन्यातच राज्यात लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

Maharashtra Budget 2024 Latest News

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (२६ फेब्रुवारी) अजित पवार यांनी एकूण ८ हजार ६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.

विधानसभा आणि विधान परिषदेत भाषण करताना अजित पवार यांनी या मागण्यांबाबत माहिती दिली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होणार आहे. त्यानंतर त्याला मान्यता दिली जाणार आहे.

दुसरीकडे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारलाच चांगलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आज देखील विरोधक अर्थसंकल्पावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

HBD Shah Rukh Khan : परदेशात बंगले अन् लग्जरी कार; बॉलिवूडचा 'किंग' कोट्यावधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT