MAHARASHTRA SSC HSC SUPPLEMENTARY RESULT 2026 TO BE DECLARED ON JULY 15 AT 1 PM Saam Tv
मुंबई/पुणे

SSC - HSC Exam : १०वी १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; वाचा A to Z अपडेट्स

SSC - HSC Exam Result News Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

Akshay Badve

  • दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार

  • निकाल अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सीट नंबर आणि इतर माहिती भरावी लागेल

  • राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या राज्य मंडळाच्या १० वी आणि १२वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै महिन्यात पार पडल्या होत्या. या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी बुधवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये सहभाग घेतला होता. राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून या कालावधीत घेण्यात आली होती. तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होऊन ८ जुलैपर्यंत चालली होती. परीक्षेनंतर लवकरात लवकर उत्तरपत्रिका वेगाने तपासून निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न केले. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि इतर माहिती भरावी. निकाल ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर त्याची प्रत डाउनलोड करून ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच गुणपत्रिका आणि इतर अधिकृत कागदपत्रे संबंधित शाळा व कॉलेज मार्फत पुढील काही दिवसांत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? ३ पदार्थ कोमट पाण्यात मिसळून प्या, रोजचा त्रास होईल बंद

शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

SCROLL FOR NEXT