Uddhav Thackeray Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठं खिंडार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टायमिंग साधलं

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. यवतमाळ, परभणी आणि बारामतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.

Satish Daud

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. यवतमाळ, परभणी आणि बारामतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेशसोहळा पार पडलाय. शिवसेना ठाकरे गटाचे दिग्रज विधानसभा संपर्कप्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड, नेर तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक अनिल चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे विधानसभा प्रमुख शेख मुश्ताख तसेच नीतीन बोकडे, तेजस काळे, हरिश्चंद्र रुपवणे, विठ्ठल शिनगारे, यादव राठोड, दिनेश भोयर, प्रफुल्ल सोळंके असे स्थानिक पदाधिकारी आणि सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

तर परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. मुंजाजी ढाले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा प्रचार प्रमुख ह भ प सारंगधर महाराज, सोनपेठ तालुक्याचे उबाठा गटाचे उप-जिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्यासह, पाथरी नगर परिषदेतील विश्वनाथ भाले पाटील, किरण भाले पाटील आणि हनिफ कुरेशी हे तीन नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे. सत्तेमध्ये आल्यापासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री बहीण योजनेसह अनेक योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

या योजनांचा लाभ आपल्या भागातील जास्तीत जास्त लोकाना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये केंद्र आणि राज्य मिळून 12 हजार रुपये आम्ही दिले, 1 रुपयात पीकविमा देणारे पहिले राज्य आपले आहे, असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री संजय राठोड, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सईद शेख, हेदेखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT