Maharashtra Bhushan award ceremony saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Bhushan Award Sunstroke Tragedy: श्री सदस्यांच्या मृतांचा आकडा 14वर, विरार येथील महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू

Maharashtra Bhushan Award Sunstroke Tragedy: आज श्री सदस्या स्वाती वैद्य (वय 34 वर्ष) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Navi Mumbai News: नवी मुंबईतल्या खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आलेल्या श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूचा आकडा आणखी वाढला आहे. आज आणखी एका श्री सदस्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा 14 पोहाचला आहे.

आज श्री सदस्या स्वाती वैद्य (वय 34 वर्ष) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. स्वाती यांच्यावर वाशीमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. स्वाती या विरार येथील रहिवाशी होत्या.

नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल, रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येत श्री सदस्य उपस्थित होते. (Latest News Update)

सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

भर उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे अनेक श्री सदस्यांचा  उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक श्री सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे- आप्पासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटलं की, पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे.माझ्या कुटूंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे.

मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

What not to ask ChatGPT: चुकूनही ChatGPT ला विचारू नका या गोष्टी; फायदा सोडून नुकसान होईल

GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT