Maharashtra ATS Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News : ठाण्यातून संशयास्पद हालचाली, महाराष्ट्र एटीएसची पडघामध्ये धाड, साकिब नाचनच्या घराची झडती

Maharashtra ATS : ठाण्यातील पडघा येथे महाराष्ट्र एटीएसने २००३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी साकिब नाचनच्या घरी छापा टाकला. त्याच्या नव्या संशयास्पद हालचालीमुळे ही कारवाई करण्यात आली असून, महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra ATS, Padgha raid : ठाण्यातील पडघामध्ये महाराष्ट्र एटीएसने (महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक) दहशतवादाशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने आज सकाळी अचानक पडघामध्ये धाड टाकली. या छापेमारीदरम्यान, एटीएसने ३००३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचन याच्या घराचीही झडती घेतली. साकिब नाचन याने २०१७ मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा संशय एटीएसला आहे. (Maharashtra ATS Raids Saquib Nachan’s Home in Padgha for 2003 Mumbai Bomb Blast Probe)

२००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला होता. साकिब नाचन याच्यावर या स्फोटांमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप होता. आता पुन्हा त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे एटीएसने ही कारवाई केल्याचे समजतेय. छापेमारीदरम्यान काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाचन याच्या घरातून काही पुरावे आढळल्यास दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश होऊ शकतो.

गुप्त माहितीच्या आधारे एटीएस ही कारवाई केली आहे. याबाबत अधिकची माहिती सध्या उपलब्ध नाही. एटीएसकडून तपास केला जात आहे. ठाण्यातील पडघामध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि एटीएस याप्रकरणी सतर्क असून, पुढील तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT