महाराष्ट्र ATS आणि Mumbai पोलिसांची कारवाई; संशयित दहशतवादी ताब्यात! SaamTvNews
मुंबई/पुणे

महाराष्ट्र ATS आणि Mumbai पोलिसांची कारवाई; संशयित दहशतवादी ताब्यात!

महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतले आहे. झाकीर असे या ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. झाकीर असे या ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावत, पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि पाकिस्तान-आयएसआय प्रशिक्षित ६ दहशतवाद्यांना मंगळवार (१४ सप्टेंबर) अटक केली होती. आता त्यांच्याशीच निगडित असणाऱ्या झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्याची मोठी कामगिरी एटीएसने केली आहे.

हे देखील पहा :

संशयित दहशतवादी झाकीरला आज सकाळीच जोगेश्वरी भागातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केल्याप्रकरणी झाकीरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. झाकीरला यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून दहशतवादी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालियाकडून शस्त्रे आणि स्फोटके मुंबईत आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की ते 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर हल्ला करण्याची योजना आखण्यात येत होती. पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून सुमारे 1.5 किलो आरडीएक्स RDX जप्त केले होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून काही लोकांची नावे देण्यात आली आहेत जे दहशतवादी मॉड्यूलला मदत करण्यासाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT