Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar Reaction on Shiv Sena MLA Disqualification Case ssd9 Saam TV
मुंबई/पुणे

Political News: आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य; CM शिंदेंचा 'तो' दावा गेमचेंजर ठरणार?

MLA Disqualification Case: राहुल नार्वेकर यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Satish Daud

Rahul Narvekar on MLA Disqualification Case

शिवसेनच्या १६ आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय येत्या ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणात काय निर्णय येणार? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशातच राहुल नार्वेकर यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचे निर्देश दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही, तर कोर्टाने नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंतची कालमर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे. रविवारी राहुल नार्वेकर यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार अपात्रता प्रकरणात त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं.

राज्यात राजकीय फटाके (Maharashtra Politics) फुटायला वेळ आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचं असतं, असं सूचक वक्तव्य नार्वेकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आमदार अपात्रता सुनावणीच्या संभाव्य निकालाबाबत संकेतच मिळाले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर?

मी घटनेला आणि संविधानाला धरूनच काम करणार, तसेच आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देणार, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. लोकशाहीत बहुमत हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे सद्यपरिस्थितीत संविधानातील कायदे आणि नियमांचे पालन केलं जाईल. जनतेला अपेक्षित असणारा आणि कायद्याला धरून असणारा निकाल दिला जाईल, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदेंचा तो दावा गेमचेंजर ठरणार?

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. आपल्याकडे आमदारांचं बहुमत असून लोकशाहीत बहुमताला महत्व असतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार करीत आहे.

इतकंच नाही, तर निवडणूक आयोगात जेव्हा शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी सुरू होती, त्यावेळीही शिंदेंनी बहुमताचा दावा केला होता. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा करीत आहेत.

आमच्याकडे बहुमत असल्याने आम्ही अपात्र ठरणार नाही, असा ठाम विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील लोकशाहीत बहुमत महत्वाचं असतं असं वक्तव्य केल्याने निकाल काय लागणार? याबाबत कुजबूज सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT