Rahul Narvekar on Mla Disqualification Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार, यावर भाष्य केलं. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, 'याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेऊ. निर्णय घेताना कुठलाही विलंब होणार नाही. घाई होणार नाही'.

'राजकीय गट कोणता आहे हे निश्चित केल्यानंतर राजकीय गटाची इच्छा काय होती. यासंदर्भातील निर्णय देऊ. प्रत्येक याचिकेवर सुनावणी घेऊ. माझ्याकडे ५ याचिका प्रामुख्याने सादर झाल्या आहेत. या याचिकेत ५४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. व्हीपबाबत निर्णय घेऊ. सगळ्या याचिकांवर सुनावणी घेऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निर्णय घेऊ, असे नार्वेकर पुढे म्हणाले .

'रिजनेबल टाइम....जो नियम एका केससाठी रिजनेबल असेल तर दुसऱ्या केससाठी रिजनेबल टाइम आहे की नाही....हे पाहावं लागेल. दिरंगाई करणार नाही. पण घाई करणार नाही. काही निर्णय चुकीचा झाला तर त्याचे परिणाम संसदीय लोकशाहीसाठी घातक ठरतील. कोर्टालाही १० महिने लागलेत. त्यामुळे घाई करणार नाही. लवकरात लवकर घेऊ, असे नार्वेकर यांनी पुढे सांगितले.

'संविधानातील तरतुदी, निष्पक्ष निर्णय असेल. यासंदर्भातील चिंता कुणीही बाळगू नये. निर्णय नियमानुसार, घटनेनुसार असेल. कमीत कमी वेळात निर्णय देऊ. यात जर कुणाला राजकीय हेतूने आरोप करायचे असतील तर ते मी थांबवू शकत नाही, असे उत्तरही नार्वेकर यांनी नाव न घेता टीकाकारांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात केले हजर

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT