Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Monsoon Session 2024 : पेपरफुटीवरून विधानसभेत घमासान; विरोधकांनी चौथ्या दिवशीही सभागृह गाजवलं, सत्ताधाऱ्यांची दमछाक

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून विरोधकांनी पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.

Satish Daud

सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून विरोधकांनी पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. पेपरफुटीविरोधात आजच्या आजच कठोर कायदा करा, असं म्हणत घोषणबाजी करण्यात आली.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. पेपर फुटीबाबत सरकार याच अधिवेशनात कायदा करणार का? केंद्राचा‌ कायदा आला त्यांचं कौतुक आहे. पण तसा कायदा इथंही आणावा. हा युवांचा मुद्दा आहे. असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मृदा आणि जलसंधारण खात्याच्या परीक्षांच्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. अशी भरती झाली तर कसं व्हायचं. पेपर फुटीविरोधात तातडीने कायदा करून आरोपींना १० वर्षांच्या शिक्षेची तरतुद ठेवा. कोणीही बडा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.

आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तलाठी परीक्षेच्या भरतीत पेपर फुटलाच नाही. उत्तर चुकलं म्हणून ती भरती‌ रद्द केली. आता टीसीएस केंद्रावर ‌परीक्षा घेतली जाणार आहे. ७५ हजारांची भरती घोषित करण्यात आली. ५७५५२ लोकांना नियुक्ती देण्यात आली आहे. अजून १९८५३ लोकांना नियुक्ती देणं ‌बाकी आहे, असं फडणवीस म्हणाले.

आतापर्यंत ७७३०५ लोकांना कुठल्याही गैरप्रकाराशिवाय राज्यानं भरती‌ केली. अजून ३१ हजार लोकांच्या विविध पातळीवर भरती सुरू आहे. सर्व परीक्षांना उपजिल्हाधिकारी दर्जाचे ‌अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले जातील.गट क दर्जाच्या जागा आता एमपीएससीमार्फत भरल्या जाणार आहेत, अशी माहिती दिली.

पेपरफुटीवरून विरोधक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करताहेत. हे अत्यंत चुकीचे आहे, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आरोप खोडण्याचा प्रयत्न केला. यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी देखील झाली. विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना महायुतीची दमछाक झाली. पेपरफुटीबाबत कायदा याच अधिवेशनात येईल. फेक नरेटिव्हबाबतचं उत्तर सभागृहाबाहेर देऊ, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT