आरोग्य भरती पेपेरफुटीवरुन विरोधक आक्रमक; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती SaamTV
मुंबई/पुणे

आरोग्य भरती पेपेरफुटीवरुन विरोधक आक्रमक; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

अटी शर्थी पूर्ण झाल्यावर आय टी विभागाने या कंपन्यांना परवानगी दिली गेली अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रामनाथ दवणे

मुंबई : आरोग्य विभाग गट क आणि गट ड परिक्षेतील पेपरफुटीवरुन विरोधक विधान परिषदेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याला उत्तर दिलं. ते म्हणाले तत्कालीन सरकारने OMR पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, त्या पद्धतीनेच आरोग्य परीक्षा घेण्यात आल्या आहेत. 18 कंपन्यांनी RMD काढल्या त्यापैकी 5 राहिल्या होत्या. निविदा मागविण्यात आल्या होत्या. अटी शर्थी पूर्ण झाल्यावर आय टी विभागाने या कंपन्यांना परवानगी दिली गेली अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

विधान परिषेदतही न्यासा कंपनीवरुन वाद पेटला. 5 लाख परीक्षा घेण्याऱ्यांच्या समावेश करण्यात आला होता. न्यासाला हायकोर्टाने निर्दोष केले होते. न्यासा कंपनीला (Nyasa Company) न्यायालयाच्या सुचने नुसार तपासणी करूनच परीक्षा घेण्याचे टेंडर देण्यात आले. मग चौकशी कसली करायची. जी चौकशी करायची आहे त्याची माहिती विरोधकांनी द्यावी, रिटायर्ड चिप सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी करता येईल असे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले. मुलांवर अन्याय होऊ नये. कुंपणच शेत खात अशी पद्धत बदलण्याची गरज आहे. जनतेच्या हितासाठी जागा भरण्याचा हेतू आहे. जे दोषी आढळले आहेत पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. मुख्यमंत्री यांनी ही दोषींवर कारवाई करणाऱ्यांना पाठीशी न घालण्याचे सांगितले आहे.

या उत्तरावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आमदार गोपिचंद पडळकर यांनी राजेश टोपे यांनी काही प्रश्न केले. न्यासा कंपन्यांचा दलालाचा ऑडिओ सोशल मीडियावर फिरला. याची चौकशी केली का?. अमरावती मध्ये 200 लोकांनी पैसे दिले याची माहिती आहेत का? अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली धागेदोरे कुठपर्यंत आहेत याची काय माहिती आहे. त्याला उत्तर देताना टोपे म्हणाले ''जी ऑडिओ क्लिप आली आहे त्याची सायबर क्राईममध्ये चौकशी सुरू आहे. याची पाळंमुळं खोदून काढुया, दोषींवर कारवाई करूया. आरोग्य विभागाने स्वतःहून FRI दाखल केलेला आहे''. न्यासाला संपुर्ण निर्देषांचे पालन करुनच काम दिल्याचे राजेश टोपे म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT