Surabhi Jayashree Jagdish
सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीरासाठी एक परिपूर्ण व्यायाम मानला जातो.
ही एक अशी योगक्रिया आहे ज्यामध्ये १२ शारीरिक आसनांचा समावेश आहे.
दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात कोणते बदल दिसून येतात.
सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात आणि लठ्ठपणा कमी होतो.
या योगामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनशक्ती मजबूत होते.
सूर्यनमस्कारामुळे थायरॉईड आणि हार्मोनल संतुलन सुधारते.
दररोज याचा सराव केल्याने मन शांत आणि स्थिर राहते. त्याचप्रमाणे तणाव आणि चिंतेवर नियंत्रण मिळवता येते.
हे नियमित केल्याने स्नायू मजबूत होतात.