पेपरफुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; फडणवीस विधानसभेत कडाडले SaamTvNews
मुंबई/पुणे

पेपरफुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; फडणवीस विधानसभेत कडाडले

या सरकारच्या काळात एकही परीक्षा पेपरफुटीविना झाली नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly) सुरु झाले आहे. त्यामध्ये राज्यातील विविध भरती परीक्षेतील पेपरफुटीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. आरोग्य भरती घोटाळा प्रकरणी फडणवीसांनी न्यासा कंपनीचा (Nyasa Company) मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे. 21 जानेवारी 2021 ला कंपनीला अपात्र ठरवलं होतं. ते कोर्टात गेले चार मार्च 2021 ला पात्र ठरवलं. तरीही त्यांना काम का दिलं? इतर कंपन्या नव्हत्या का? जीए सॉफ्टवेअर कंपनीने TET परीक्षेत घोटाळा केला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा पेपरफुटीविना झाली नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

आरोग्य विभाग क आणि ड गट परीक्षा झाली. न्यासाने परीक्षा फोडण्यापासून सगळं केलं. माजी आमदारांनी घोटाळा उघडकीस आणला. त्यांच्याकडे ऑडिओ आहे की एका पदाची बोली कशी लावली जाते. एतका घोटाळा झाला की परिक्षार्थींना वेगवेगळे परिक्षाकेंद्र मिळाले. न्यासाचा दलाल नियुक्तीचे रेट कार्ड देत होता. अमरावतीत 200 उमेदवारांनी पैसे दिल्याचा दावा दलाल करतो. या पेपरफुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत आहेत. शासकीय यंत्रणा सडली आहे अशी टीका फडणवीसांनी सभागृहात केली. आणि या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याचीही विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अध्यक्षांकडे केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही पेपेरफुटीच्या प्रकरणी चर्चा लावली पाहिजे अशी मागणी आणि विनंती केली आहे. या घोटाळ्या तार कुठपर्यंत गेली हे तपासले पाहिजे. ह्याची चर्चा होऊन काय कारवाई केली हे कळलं पाहिजे असे नाना पटोले म्हणाले. फडणवीसांनी अध्यक्ष निवडीवरुन देखील सरकारला धारेवर धरले त्याला नाना पटोले यांनी उत्तरं दिलं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT