Nana Patole Slams DCM Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Mlc Election : विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; भाजप आमदाराच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध, महायुतीचं टेन्शन वाढलं

Maharashtra Vidhan Parishad Election Ganpati Gaikwad News : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसने विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र देखील लिहलं आहे.

Satish Daud

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे आमदार मतदान करण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. अशातच भाजपच्या एका आमदाराच्या मतदानाला काँग्रेसने विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देखील लिहलं आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसने (Congress) विरोध केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर गणपत गायकवाड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. ते मतदान करण्यासाठी येत असल्याचं कळताच काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखावं, असं काँग्रेसनं पत्र लिहिलं आहे.

गणपत गायकवाड हे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदान करू शकत नाहीत. त्यांचे मत अवैध्य ठरू शकतं. त्यामुळे त्यांना मतदानाची परवानगी देऊ नये, असं काँग्रेसने निवडणूक आयोगाला (Election Commission) लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक हे देखील तुरुंगात असताना त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं होतं.

त्याप्रमाणेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करु देऊ नका, अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या या पत्राची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली असून यासाठी ते केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार घेणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जर गणपत गायकवाड यांचं नाव मतदान यादीत नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल. गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही किंवा कोर्टाने अद्याप सजा सुनावलेली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करता येऊ शकतं, असं निवडणूक आयोगातील सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलं आहे. तरी देखील राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT