MVA seat sharing Saam Tv
मुंबई/पुणे

MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला; ठरला 85-85-85 फॉर्म्युला, मित्रपक्षांसाठी किती जागा?

MVA Seat Sharing formula : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.आघाडीचा ८५-८५-८५ जागावाटपाचा असा फॉर्म्युला ठरला आहे. काही जागांवरील जागावाटप अद्याप बाकी आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर ठरलं आहे. महाविकास आघाडीची २७० जागांवर सहमती झाली आहे. २७० जागांवर सहमती झाल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्या गुरुवारी मित्रपक्षांसोबत चर्चा करणार आहेत. तर मविआच्या जागावाटपात अद्याप ३३ जागांवर निश्चित झालेली नाही.

महाविकास आघाडीचं जागावाटप ठरल्यानंतर प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे सांगितले. राऊत म्हणाले, 'महाविकास आघाडीचं जागावाटपं सुरळीत पार पडलं आहे. राज्यातील सर्व जागांवरील जागावाटप पूर्ण झालं आहे. आमची २७० जागांवर सहमती झाली आहे. आम्ही उरलेल्या काही जागांवर मित्रपक्षांची चर्चा करणार आहोत. आम्ही मित्र पक्षांसोबत उद्या बैठक करणार आहोत'.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

खासदार संजय राऊत म्हणाले, ;गेले काही दिवस आम्हाला सगळ्यांना नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अनिल देसाई, अनिल देशमुख, नाना पटोले सर्वांना कायम जागावाटप काय झालं, किती झालं, होतंय की नाही. होणार आहे की नाही. आता सगळे एकत्र आहोत. अखेरची बैठक शरद पवारांसोबत पार पडली. पवार साहेबांनी सांगितलं की मीडियासमोर घोषणा करा'.

'महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीत झालंय. आमच्या तिन्ही पक्ष, काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, इतर आघाडीतील घटकपक्ष या सगळ्यांना सामावून घेणारं जागावाटप पूर्ण झालं आहे, असे ते म्हणाले.

'तिन्ही पक्ष हे साधारण ८५-८५-८५ असे साधारण २७० जागांवर सहमती झाली. यादीही तयार केली आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांशी चर्चा सुरू होईल. २८८ जागा पूर्ण ताकदीने लढून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्या आम्ही सगळे एकत्र बसू आणि नव्याने चर्चा करू. २८८ जागांचा प्रश्न सुटला. ८५-८५-८५ हा तीन प्रमुख पक्षांचा फॉर्म्युला आहे. उर्वरित जागांवर जरी दावा असला तरी तो चर्चा करून सोडवला जाईल, असेही संजय राऊतांनी सांगितले.

नाना पटोले काय म्हणाले?

'शरद पवारांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षांची बैठक झाली. प्रत्येकी ८५ अशा साधारण २७० जागांवर एकमत झालंय. उर्वरित घटकपक्षांना उरलेल्या १८ जागांबद्दल त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं बहुमत असलेलं सरकार येईल, असे नाना पटोले यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

SCROLL FOR NEXT