Amit Thackeray Vs Aaditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: वरळीत रंगणार महाभारत! आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री; ठाकरे बंधू आमने-सामने येणार?

Amit Thackeray Vs Aaditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळी हा त्यांचे चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्या रडारवर आलाय. अमित ठाकरेंनी वरळीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळी हा त्यांचे चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्या रडारवर आलाय. अमित ठाकरेंनी वरळीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मनसेनं वरळीत उमेदवार देणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे ठाकरे विरूद्ध ठाकरे सामना रंगण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधू आमने-सामने येणार?

लोकसभा निवडणूकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिलेल्या मनसेने विधानसभेसाठी स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यातच राज ठाकरेचे पूत्र अमित ठाकरेंनी आता बंधू आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केलीय. त्यामुळे वरळीत दोन ठाकरेंमध्ये महाभारत रंगण्याचं चित्र निर्माण झालंय.

2019 मध्ये राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदाच्या लोकसभेत मनसेनं महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिब्यांवरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवलीय. त्यानंतर राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंनीही आपलं लक्ष बंधू आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघाकडे वळवलंय.

बंधू आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी साखरपेरणी करणार आहेत. मात्र वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अमित ठाकरे नाही तर मनसे नेते संदीप देशपांडे हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे अमित ठाकरेंनी संदीप देशपांडेंसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय.

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री झाल्याने आता वरळीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. .2019 मध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं वरळीच्या मैदानात आदित्य ठाकरेंविरोधातला संघर्ष टाळला होता.

यंदा स्वत: राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी सक्रीय झालेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आपला गड राखण्यासाठी काय रणनीती आखतात याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT