सुनील काळे, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतली आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.
महाविकास आघाडीची मुंबईच्या बीकेसीत जंगी सभा झाली आहे. या सभेत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली. याच जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
आता निवडणुकाचे फटाके फुटायला लागले आहेत. आपल्याकडे बॉम्ब आहेत. तिकडे तडतड्या फुलबाजे आहेत.
आपल्याला २३ तारखेला विजयाचे फटाके वाजवायचे आहेत.
योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ दिसतोय. आनंदाच्या शिधामध्ये उंदराच्या लेंड्या मिळत आहे.
पाच जीवनाश्यक वस्तू आम्ही स्थिर ठेवू, शेतकऱ्यांचं नुकसान न करता देऊ. हे सरकार उद्या श्वास घेण्यावरही टॅक्स लावतील.
आपण खुलेआम करतो, काळोख्यात काही करत नाहीत. २ लाखांपर्यंतचं कर्ज आपण माफ करुन दाखवलं आहे. जे बोलतो ते आपण करतो.
बेरोजगार तरुणांना चार हजारांची मदत करणार आहोत. संविधान वाचवायचं आहे, भाजपला ते फेक नरेटिव्ह वाटत आहे.
धारावीसह मुंबईच्या २० जागा अदानींच्या घशात घातल्या जात आहे. आमचं सरकार आल्यावर ते कंत्राट आम्ही रद्द करु. मुंबई वाचवावी लागणार आहे.
कोरोना काळात धारावी वाचवली, तशीच आता धारावी वाचवावी लागणार आहे.
कोळीवाड्यांच्या जमिनी आम्ही कोणाला क्लस्टरसाठी देऊ देणार नाही. ही निवडणुक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी आहे.
मी बोललो सुरतेला महाराजांचं मंदिर बांधू. देवाभाऊ बोलले मुंब्र्यात महाराजांचं मंदिर बांधून दाखवा.
देवेंद्र फडणवीस तिथं जाऊन बघा तिथल्या एन्ट्री गेटला महाराजांचं शिल्प आहे. तुम्हाला ठाण्यातला गद्दार असताना महाराजांचं मंदिर बांधता येत नाही का? नुसती आव्हान देऊ नका?
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.