Maharashtra Assembly Election 2024 Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं? सकाळ-CSDCचं सर्वेक्षण वाचा क्लिकवर

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला, याबाबत सकाळ-CSDCचं सर्वेक्षण झालं. याबाबत सविस्तर माहिती वाचा क्लिकवर

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी, महायुतीमधील राजकीय पक्ष, इतर राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोणाचा होणार, हे २३ ऑक्टोबर रोजी समोर येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सकाळ-CSDC सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) आणि पुण्यातील एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग) यांच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास २०२४’ मध्ये महाराष्ट्राबाबत निष्कर्ष सादर करण्यात आले आहेत.

तसेच जनतेचा कौल कोणाला याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणानुसार, राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळणार, याबाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Assembly Election

राज्याचा एकूण विकास

महायुती - 41 टक्के

मविआ - 45 टक्के

सामाजिक सौहार्द

महायुती - 37 टक्के

मविआ - 41 टक्के

स्थिर सरकार

महायुती - 39 टक्के

मविआ - 40 टक्के

Maharashtra Election

सरकारी शाळा / कॉलेजेसची स्थिती

मविआ - 35 टक्के

महायुती - 32 टक्के

फरक नाही - 24 टक्के

Maharashtra Assembly Election २०२४

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

मविआ - 26 टक्के

महायुती - 34 टक्के

फरक नाही - 35 टक्के

Maharashtra Assembly Election update

शेतकऱ्यांची स्थिती

मविआ - 31 टक्के

महायुती - 23 टक्के

फरक नाही - 30 टक्के

वीजपुरवठा

मविआ - 27 टक्के

महायुती - 37 टक्के

फरक नाही - 32 टक्के

रस्त्यांची स्थिती

मविआ - 24 टक्के

महायुती - 43 टक्के

फरक नाही - 28 टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Shinde Group Candidate List: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, ४५ जणांना उमेदवारी; कुणाकुणाला संधी? वाचा..

Anil Deshmukh: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'; पुस्तकातून अनिल देशमुखांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Assembly Election: पुण्यात कारमध्ये सापडली 5 कोटींची रोकड; पोलीस, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं मात्र मौन

Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

Maharashtra News Live Updates: खडकवासलामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT