विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. दरम्यान, सकाळ समूहाने एक्झिट पोल जाहीर केले आहेत. पर्वती मतदारसंघात भाजपचं पारडं जड होणार असल्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून पुन्हा माधुरी मिसाळ जिंकून येऊ शकतात.
पर्वती मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होत आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ विरुद्ध अश्विनी कदम अशी लढत होणार आहे. यात माधुरी पिसाळ विजयी होऊ शकतात.माधुरी मिसाळ संभाव्य आमदार आहेत.
पुण्यातील पर्वती मतदारसंघातून तिरंगी लढत होणार आहे.या मतदारसंघात महायुती, महाविकासआघाडी आणि काँग्रेसचे बंडखोर आमदार आबा बागुलदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे या मतदारसंघातून कोण निवडून येणार याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
या मतदारसंघात महाविकासआघाडीची अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्याचा फायदा भाजपच्या माधुरी मिसाळ यांना होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.