Mahayuti Seat Sharing Formula  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भाजपचं ठरलं! विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार, शिंदे-पवारांचं टेन्शन वाढणार!

Mahayuti Seat Sharing Formula: भाजप महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणार, असा निर्णय झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

BJP will Contest the Most Seats From the Mahayuti Maharashtra Political Updates: विधानसभा निवडणुकीला आता अवघ्या काही दिवसांचाच कालावधील शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय नेते आतापासूनच तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमधील घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. अशातच भाजप महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणार, असा निर्णय झाल्याची माहिती आहे.

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभेत भाजप तब्बल 160 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

यापैकी 125 जागांवर त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 64 जागा मिळणार असल्याचं असल्याचं कळतंय. गेल्या निवडणुकीतही भाजपने 150 हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी 105 जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळेच सध्या भाजप हा महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्याकडे प्रत्येकी 40 आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत वाद होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांना प्रत्येकी 64 जागा दिल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजपचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला शिंदे आणि अजितदादा गटाला मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अमित शहांनी बैठकीत काय सूचना केल्या?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना बैठकीत काही महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. विरोधक आपली प्रतिमा खराब करण्यासाठी फेक नरेटिव्ह करत राहतील त्यास प्रतिउत्तर द्यावेच लागेल, असं अमित शहांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपमधील महत्वाच्या नेत्यांकडे प्रचाराची जबाबदारी दिली जाणार, त्यांना सहकार्य करा तसेच महायुतीत कुठलेही मतभेद होऊ देऊ नका, अशा सूचना देखील अमित शहांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT