मुंबई: कोरोना काळामध्ये केलेल्या उपाययोजना आणि संसर्गस्थितीची योग्य हाताळणी यामुळे राज्याच्या (state) अर्थव्यवस्थेने चांगलीच उभारी घेतली आहे. मागील वर्षी ८ टक्क्याने घसरलेल्या विकास दरात १२.१ वाढ अपेक्षित असून कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा हातभार लावल्याचे आज सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगितले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये (Convention) आज सन २०२१- २२ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर आज अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. (Maharashtra Ajit Pawar to present state budget)
सन २०२२- २३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर आर्थिक पाहणी अहवालामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र समोर आल्यामुळे राज्य सरकारला (State Government) मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये राज्यामध्ये कोरोनाने (Corona) शिरकाव केल्यापासून राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. मागील वर्षी मात्र विकासदर घसरला होता. शिवाय कृषी आणि विविध क्षेत्राची पिछेहाट करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचे संकट हळू- हळू दूर होऊ लागल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने आपली घौडदौड सुरु केली आहे.
हे देखील पहा-
आर्थिक पाहणी अहवालामध्ये दरडोई राज्य उत्पन्नामध्ये वाढ दाखवण्यात आली आहे. २०२०- २१ मध्ये दरडोई राज्य उत्पन्न १ लाख ९३ हजार २११ रुपये होते. पूर्वानुमानानुसार २०२१- २२ मध्ये राज्य दरडोई उत्पन्न २ लाख २५ हजार ७३ कोटी रुपये इतके असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षात राज्य वस्तू सेवा कर, विक्रीकर, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी, राज्य उत्पादन शुल्क यामधून सरकरी तिजोरीत मोठी भर पडली आहे. राज्याची अर्थव्यवस्था कात टाकत असतानाच सरकारचा महसुली जमेचा अंदाज चुकला आहे. (Maharashtra Ajit Pawar to present state budget)
अर्थसंकल्पी अंदाजानुसार महसुली जमा ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रुपये अपेक्षित होती. यामध्ये घट होऊन आता सुधारित अंदाजानुसार महसुली जमा २ लाख ८९ हजार ४९८ कोटी रुपये अपेक्षित आहे. चालू आर्थिक काळामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत १ लाख ८० हजार ९५४ कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पी अंदाजाच्या ४९ टक्के प्रत्यक्ष महसुली जमा होते. महसुली जमा कमी असल्यामुळे महसुली खर्च सुधारित अंदाजानुसार ३ लाख ३५ हजार ६७५ कोटी रुपये असणार आहे. महसुली खर्चाचा अर्थसंकल्पी अंदाज ३ लाख ७९ हजार २१३ कोटी रुपये होता.
या वर्षी देखील राज्य सरकाला कोरोना बरोबरच नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. यामुळे सरकारला खुल्या बाजारात कर्ज काढावे लागणार आहे. परिणामी राज्यावर कर्जभार वाढला आहे. अर्थसंकल्पी अंदाजानुसार, मार्च २०२२ पर्यंत राज्यात ५ लाख २५ हजार ८६२ कोटी रुपयांचे कर्ज अपेक्षित होते. मात्र, कर्जाचा आकडा वाढून ६ लाख १५ हजार १७० कोटीवर येऊन पोहचणार असल्याचा अंदाज आहे. अंदाजापेक्षा राज्यावर कर्ज तब्बल ९० हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. (Maharashtra Ajit Pawar to present state budget)
राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून १५ जानेवारी २०२२ पर्यंत राज्यात कोरोनामुळे १ लाख ४२ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पाहणी अहवालात देण्यात आली आहे. राज्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या ७१ लाख ७० हजार इतकी होती. यापैकी ६७ लाख ६० झार रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४.३ टक्के असून मृत्यू दर दोन टक्के असल्याचे अहवालामध्ये सांगितले जात आहे. राज्यामध्ये १७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १८ वर्षावर एकूण ६ कोटी ४८ लाख व्यक्तींचे तर १५ ते १८ वयोगटातील ४५ लाख मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.