Mahajyoti Scholarship Exam Cancelled Saam Tv
मुंबई/पुणे

Exam Cancelled: विद्यार्थ्यांचा त्रास कधी संपणार? आणखी एका परीक्षेत गोंधळ, महाज्योती परीक्षा रद्द

Mahajyoti Scholarship Exam Cancelled: पुण्यातील आंबेगाव येथे महाज्योती स्कॉलरशिपची परीक्षा आज होणार होती. पण तांत्रिक अडचणींमुले ही परीक्षा रद्द करण्यात आली त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

Priya More
  • महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली

  • तांत्रिक अडचणींमुळे अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक

  • पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कूल परीक्षा केंद्रावर गोंधळ

  • अनेक विद्यार्थ्यांचे कम्प्युटर सुरू झाले नसल्याची तक्रार

देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे. नीट पेपरफुटी आणि एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थी आक्रमक झालेत. त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं देखील केली. आता आणखी एका प्रमुख परीक्षेवरून गोंधळ झाला आहे त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. महाज्योती परीक्षा गोंधळानंतर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले करे पण तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाज्योती स्कॉलरशिपची परीक्षा आज होणार होती. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले. पण परीक्षा केंद्रावर पोहचताच विद्यार्थ्यांची निराशा झाली. या परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षा केंद्रावर कम्प्युटर उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याच कारणामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली.

महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षा आंबेगाव भागातील सन ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. मात्र परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपासूनच केंद्रावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. केंद्रातील अनेक विद्यार्थ्यांचे कम्प्युटर सुरू झाले नाहीत, तसेच काही विद्यार्थ्यांचे लॉगइन देखील झाले नाही. संपूर्ण केंद्रातील फक्त काही विद्यार्थ्यांचेच लॉगइन झाले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे कम्प्युटर परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच बंद पडले, तर काही विद्यार्थ्यांचे कम्प्युटर अचानक लॉगआऊट झाले. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळालेला नियोजित वेळ प्रभावीपणे वापरता आला नाही अशी विद्यार्थ्यांनी तक्रार केली.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षा रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, आंबेगाव येथील महाज्योतीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या केंद्रावर तांत्रिक अडचणींमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देताना त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नारिंगे यांच्याशी फोनवरून चर्चा करून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी,अशी ठाम मागणी केली. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना तांत्रिक गोंधळाचा फटका त्यांच्या भवितव्याला बसता कामा नये.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत सर्वोच्च तापमानाची नोंद, ३७ वर्षानंतर ३९.६ अंश तापमान

Virat Kohli: विराट कोहली ५ कोटी घेऊन प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेला? खळबळजनक सत्य आले समोर

PM Narendra Modi : "आपण करून दाखवू...." २०४७ पर्यंत भारताला विकसित देश घडवण्याचे स्वप्न; पंतप्रधान मोदींची नवीन घोषणा

OTT TOP 5 MOVIES : हॉलिवूडलाही मात देतील 'हे' ५ चित्रपट; शेवटचा ट्विस्ट पाहून थक्क व्हाल

RBI Repo Rate: रेपो रेट वाढला, आता तुमच्या EMI वर परिणाम होणार; होम- कार अन् पर्सनल लोनमध्ये काय बदल झाला?

SCROLL FOR NEXT