Maharashtra Election : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : मविआची पंचसूत्री! महिलांना ३ हजार, कुटुंबाला २५ लाखांपर्यंत विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफ

Maharashtra Election update : महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली आहे. या सूत्रीत महिला, युवक आमि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाविकास आघाडीने मुंबईत प्रचाराचा नारळ फोडला आहे. महाविकास आघाडीने बीकेसीत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पंचसूत्री जाहीर केली.

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पंचसूत्रीत महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने महिलांना महिन्याला प्रत्येकी ३००० हजार रुपये, युवकांना महिन्याला प्रत्येकी ४००० रुपये जाहीर केले. तसेच कुटुंबाला २५ लाखांपर्यंत विमा जाहीर केला आहे. यासहित शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. सत्तेत आल्यावर या योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वसन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलं.

महाविकास आघाडीने राज्यातील जनतेला ५ गॅरंटी दिल्या आहेत. मुंबईतील बीकेसी मैदानातील सभेत या गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये देण्याचे जाहीर केले आहेत. तसेच महिला आणि मुलींना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे जाहीर केले.

तसेच शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांमार्फत तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचं प्रोत्साहन देणार आहे. जातनिहाय जनगणना करणार असल्याचेही जाहीर केले. त्याचबरोबर ५० टक्के आरक्षण मर्यादा हटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देणार असल्याचे जाहीर केले. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत करण्याचे जाहीर केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: इवोनिथ मेटालिक स्टील कंपनीत स्फोट, 13 ते 14 मजूर जखमी

Raj Thackeray Speech:...तर महाराष्ट्र बरबाद होणार; राज ठाकरेंनी इशारा का दिला? VIDEO

Uddhav Thackeray: सगळ्यांची नावे लिहून ठेवा! उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले, काय आहे कारण?

Uddhav thackeray Speech : ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली,VIDEO

Mill Worker: मुंबईचे गिरणी कामगार शेलू गावात विसावणार; 30 हजार जणांना मिळणार घरं

SCROLL FOR NEXT