CET Exam Dates Saam Tv
मुंबई/पुणे

CET Exam Dates: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CET परिक्षेचं वेळापत्रक जाहीर

CET Exam 2025 Dates: उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीईटी परिक्षांची तारीख जाहीर झाली आहे.

Siddhi Hande

उच्च शिक्षण घेणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परिक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये अॅडमिशन होते. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रिय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप फेरीत सहभागी होऊन प्रवेश मिळवता येतो. (CET Exam Date Announced)

तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी (पीसीबी गट) परीक्षा ९ ते १७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी (पीसीएम) परीक्षा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. (MAH CET 2025 Date )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT