LPG Cylinder Saam Tv
मुंबई/पुणे

LPG Cylinder: वेळीच व्हा सावध! गॅस बुकिंगच्या नावाखाली बँक अकाऊंट होतंय रिकामं; या चूका टाळा

LPG Cylinder Booking Online Scam: एलपीजी गॅस बुकिंगच्या नावाखाली फ्रॉड होत आहेत. ऑनलाइन लिंक पाठवून तुम्हाला फसवले जात आहे. ऑनलाइन यूपीआयच्या माध्यमातून पैसे घेऊन तुमची फसवणूक केली जात आहे.

Siddhi Hande

एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

फेक वेबसाइटवर पेमेंट करु नका

पोलिसांकडूव नागरिकांना आवाहन

मध्य पूर्वेकडील देशांमधील युद्धामुळे व्यापारावर परिणाम होत आहे. इंधनाची आयात होत नाहीये. त्यामुळे गॅस आणि इंधन पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण बंद केले आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी लांब रांगा लागल्या. सर्वजण ऑनलाइन गॅस नोंदणी करत आहे. परंतु याचाच गैरफायदा स्कॅमर्स घेत आहेत.

ऑनलाइन गॅस बुकिंगसाठी अनेक अडचणी येत आहेत. याचाच फायदा सायबर फ्रॉड करणारे लोक घेत आहेत. ते नागरिकांना गॅस बुकिंगसंदर्भात खोटा मेसेज पाठवत आहेत. त्यांना खोटे कॉल, मेसेज आणि लिंकच्या माध्यमातून फसवत आहे.यासाठीच पोलिसांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

एलपीजी सिलिंडरच्या नावाखाली फ्रॉड (LPG Gas Cylinder Booking Fraud)

गॅस बुकिंग हे ऑनलाइन होते. मात्र, गॅसचा पुरवठा कमी असल्याने अनेकजण एकाचवेळी बुकिंग करत आहेत. याचसोबत अनेकजण वारंवार गॅस बुकिंगवर जात आहेत. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे.

सायबर चोर नागरिकांच्या मुलांना मेसेज पाठवत आहेत. त्यांना एक लिंक ओपन करण्यासाठी पाठवतात. यामध्ये ते गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचा दावा करतात. त्यानंतर मेसेजमध्ये एक लिंक ओपन करण्यास सांगतात. तसेच लगेच डिलिव्हरी करतात असं सांगून लिंक ओपन करण्यास सांगतात. यामध्ये फेक वेबसाइटवर जाण्यास सांगतात. त्यानंतर तुमचे बँक डिटेल्स, ओटीपी किंवा यूपीआयवरुन पेमेंट करायला सांगतात. पेमेंट केल्यानंतर वेबसाइट आपोआप बंद होते. यानंतर तुमचे पैसेदेखील जातात आणि गॅस सिलिंडरची डिलिव्हरीदेखील होत नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गॅस बुकिंग करताना ही काळजी घ्या

फक्त अधिकृत गॅस एजन्सी नंबरवर विश्वास ठेवा.

कोणतीही गॅस एजन्सी तुमच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत नाही. कोणताही फॉर्म भरण्यास सांगत नाही.

तुम्ही गॅस बुकिंग करताना अधिकृत वेबसाइटवरुनच करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Season Saree Designs: उन्हाळ्यात कोणती साडी नेसावी? हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Saree Reuse Dress: लग्नसराई ते डेली वेअर, कपाटातल्या जुन्या साड्यांपासून शिवता येतील ७ नवे ट्रेंडी ड्रेस

LPG Gas Cylinder: कॉल करुन सिलेंडर बुक होत नाही? आत्ताच फॉलो करा या ४ स्टेप्स; बुकिंग करूनही न मिळाल्यास 'इथे' करा तक्रार

LPG Cylinder : सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ३ स्टेप्स फॉलो करून झटक्यात करा चेक

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

SCROLL FOR NEXT