lonavala tata dam, lonavala rain update saam tv
मुंबई/पुणे

Lonavala Tata Dam News : पावसाळी पर्यटन... लोणावळ्यात पावसाची मज्जा काही औरच, टाटा धरण 90 टक्के भरले

Lonavala News : लाेणावळ्यातील अवघड वळणावर धुक्यात रस्ता हरवताे. पर्यटक पावसाची मजा लुटताना दिसतात

दिलीप कांबळे

Lonavala Rain News : लोणावळ्यात गेल्या आठवडयापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे लोणावळ्यातील टाटा धरण (lonavala tata dam) आतापर्यंत 90 टक्के इतके भरले आहे. पावसाचा जोर वाढत गेल्यास टाटा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल असे धरण व्यवस्थापाने नमूद केले. (Maharashtra News)

लोणावळ्यात (lonavala) दमदार पाऊस काेसळत आहे. सहारा अँबी व्हॅली, टायगर पॉइंट तसेच भुशी धरण परिसरात दमदार पाऊस हाेत आहे. या ठिकाणी धुक्याची झालर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी हाेत असते. याबराेबरच लोणावळ्यातील टाटा धरण 90 टक्के भरले आहे.

दरम्यान पावसाचा जोर वाढत गेल्यास टाटा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असे धरण प्रशासनाने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार टाटा धरणातून पाण्याचा विसर्ग हा इंद्रायणी नदी पात्रात केला जातो. त्यामुळे इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येताे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT