RAJMACHI LANDSLIDE: MASSIVE ROCKFALL BLOCKS FORT ROUTE, OVER 100 TOURISTS STRANDED saam tv
मुंबई/पुणे

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

Rajmachi Landslide: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळण्याची मोठी घटना घडली आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

Bharat Jadhav

  • लोणावळा परिसरातील राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली.

  • दरडीमुळे 100 ते 125 फूट परिसरात दगड-मातीचा ढिगारा साचून रस्ता पूर्णपणे बंद झाला

  • घटनेमुळे 100 हून अधिक पर्यटक राजमाची परिसरात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

लोणावळा शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीमुळे सुमारे 100 ते 125 फूट परिसरात मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर पसरली आहे. राजमाचीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.

शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने राजमाची किल्ला आणि कातळदरा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या भागात गेले होते. दरड कोसळल्यानंतर अनेक पर्यटक रस्त्याच्या पलीकडे अडकलेत. पायी जाणारे काही पर्यटक कसेबसे सुरक्षित परतले आहेत. मात्र वाहनांसह गेलेले अनेक पर्यटक अडकून पडलेत.

100 पर्यटक अडकले

डेला रिसॉर्टच्या मदतीने जेसीबी आणि कामगारांच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, दरडीचा मोठा आकार पाहता संपूर्ण रस्ता पूर्ववत होण्यासाठी किमान एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. या परिसरात 100 पर्यटक पायी कोसळलेल्या दरडीवरून लोणावळ्याच्या दिशेने येऊ शकतात परंतु त्यांची वाहने घेऊन त्यांना येता येणार नाही.

सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे राजमाची मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबुतीकरणाची आणि सुरक्षिततेची मागणी अनेकदा प्रशासनाकडे केली आहे. लोणावळा शहरापासून सुमारे 16 किलोमीटरचा हा मार्ग पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे कायमच असुरक्षित ठरतोय. प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून

खारघर येथील प्रसिद्ध आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात बुडून मयत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पावसाळ्यामुळे नवी मुंबईतील पांडवकडा धबधबा पर्यटकांनी फुलून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

Maharashtra News Live Update: हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूल गेला वाहून

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

Morning tea: चहा पिण्यापूर्वी ही 1 सोपी गोष्ट करा; अॅसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होणार नाही

SCROLL FOR NEXT