LONAVALA FAKE CALL CENTRE BUSTED saam tv
मुंबई/पुणे

बनावट कागदपत्रे, खोटे दस्तऐवज अन् लाखोंची उकळणी! बनावट कॉल सेंटरमधून अमेरिका-कॅनडातील नागरिकांची आर्थिक फसवणूक

Pune Rural Police Bust Fake Call Centre in Lonavala: लोणावळ्यातील बनावट कॉल सेंटरचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून २० जणांना अटक करण्यात आली आहे.

Akshay Badve

लोणावळा, पुणे जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून फक्त राज्यात नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असे शहर. पावसाळा, हिवाळा अगदी कुठला ही ऋतू असो दररोज या शहरात हजारो पर्यटक येतात. मात्र याच ठिकाणाहून पुणे ग्रामीण पोलिसांनी एक बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय. नामांकित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवून या कॉल सेंटरमधून अमेरिका, कॅनडासह विविध देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोणावळ्यातील ओमेगा सोसायटीमधील देव व्हिला येथे हे कॉल सेंटर कार्यरत होते. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात २० आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, खंडणी आणि अन्य संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम व इंडियन टेलिग्राफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी २० जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी कारवाई दरम्यान लॅपटॉप, मोबाइल, वाहने आणि रोकड असा एकूण ३६ लाख ४१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब खडके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील नांगरगाव येथील एका आलिशान बंगल्यामध्ये बुधवारी पहाटे हा प्रकार सुरू होता. आरोपींनी हा बंगला भाड्याने घेऊन तेथे बेकायदा कॉल सेंटर सुरू केले होते. या बोगस कॉल सेंटरमधून इंटरनेटच्या मदतीने परदेशातील नागरिकांशी संपर्क साधला जात होता. परदेशातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी लॅपटॉप, मोबाईल आणि विविध अॅप्लिकेशन्सचा वापर करण्यात येत होता. जगविख्यात कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आरोपी बनावट कागदपत्रे व ओळखपत्रांच्या आधारे नागरिकांचा विश्वास संपादन करत असे. नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा यासाठी आरोपींनी बनावट ओळखपत्र आणि कंपन्यांचे दस्त सुद्धा तयार केले होते.

या कॉल सेंटर मधून परदेशातील नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवली जात होती. तसेच, संबंधित नागरिकांच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. नागरिकांच्या बँक खात्याची तसेच क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड ची माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रक्कम भारतीय चलनात

इरफान अब्दुल गफूर शेख हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. शेख हा या कॉल सेंटरचा मालक होता. मो. फैज ऊर्फ नाजिश आरिफ शेख च्या मदतीने हे कॉल सेंटर कार्यरत होते. परदेशातील नागरिकांची उकळलेली रक्कम हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारतीय चलनात मिळवली जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. एकदा ही रक्कम भारतीय चलनात आली की आरोपी ही रक्कम स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असे.

मुंबई आणि ठाण्यातील आरोपींना बेड्या

बोगस कॉल सेंटर प्रकरणात आत्तापर्यंत २० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपी हे १९ ते २६ या वयोगटातील आहेत. अमान इम्तियाज शेख, नाजिश आरिफ शेख, रिहान सलम घनानी, मोहम्मद अलीरजा सय्यद, तावीश मेहबूब अली शेख, कामरान इसामुद्दीन शेख, सद्दाम चाँद खान, झहिर वाहिद खान, जाहीद आजम शेख, शादाब जावेद सय्यद, इरफान अब्दुल गफूर शेख, समीर इरफान शेख, इरशाद इरफान शेख, अमीर सिराज खान, मकसूद शमीम चौधरी, मोहम्मद अफजल शेख हर्शद शेख, अब्दुल आहात मोहम्मद रफिक खान हे सर्व आरोपी मुंबईच्या मालाड भागातील रहिवासी आहेत. दुसऱ्या बाजूला, कुलदीप मनोज बागडी, सुजल खुमबहादूर राणा, धनराज देवजीत बोस हे सर्व आरोपी ठाणे जिल्ह्याचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSR : मतदार यादीतील SSR प्रक्रिया नेमकी काय असते? जाणून घ्या सविस्तर

खासगी रुग्णालयांसाठी नवे नियम, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; काय आहेत नियम? जाणून घ्या

दसऱ्याच्या सुट्ट्या वाया घालवू नका, लॉंग वीकेंडवर भारतातील 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

SCROLL FOR NEXT