Mahayuti (BJP, Shivsena Eknath Shinde Group,NCP Ajit Pawar Group) Seat Sharing Saam Tv
मुंबई/पुणे

Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागावाटपाची दिल्लीत खलबतं; शिंदे-पवारांची अमित शहांसोबत चर्चा, काय निर्णय झाला?

Lok Sabha Election 2024: शुक्रवारी रात्री (ता.८) महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शहांच्या (Amit Shaha) दरबारी जवळपास दोन तास खलबंत रंगली

Satish Daud

Mahayuti Seat Sharing Formula

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून खल सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होऊनही जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शुक्रवारी रात्री (ता.८) महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शहांच्या (Amit Shaha) दरबारी जवळपास दोन तास खलबंत रंगली. जागावाटपाच्या मुद्द्यावर तुटेपर्यंत न ताणण्याची तयारी भाजपकडून दाखवण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिंदे आणि पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्यात भाजपने तयारी दर्शवली नाही. (Latest Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने ठरवलेल्या सूत्रानुसारच महायुतीत जागावाटप होईल, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. विजयाची खात्री, हाच निकष भाजपचा असल्याचं शहा यांनी दोन्ही नेत्यांना सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटात नाराजीचा सूर आहे. (Loksabha Election 2024)

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला एक आकडी म्हणजेच ४ किंवा ५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तर शिंदे गटाला ७ ते ८ जागा सोडणार, असं अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कमी जागा दिल्या जात असल्या तरी, विधानसभा निवडणुकीत मात्र अधिक जागा देऊ, असं आश्वासन देखील अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत नेमकी अधिकृत घोषणा कधी होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT