mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local train : लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; ट्रेनच्या पेंटाग्राममधून उडाल्या ठिणग्या, प्रवासी भयभीत

Mumbai central Local train : मुंबईची लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. दादर रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

Vishal Gangurde

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दिवा-मुंब्रा लोकल अपघातामुळे मुंबईकरांची लाईफलाईन पुन्हा चर्चेत आली आहे. लोकल अपघाताच्या दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर लाईन मार्गाची सेवा आज सकाळी ठप्प झाली होती. बेलापूर-सीवूड्स स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे सुमारे २० ते २५ मिनिटे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेची सेवा देखील विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मध्य रेल्वेवरील या लोकल ट्रेनमध्ये पेटांग्राममध्ये ठिणग्या उडत असल्यामुळे रेल्वे प्रवासी तातडीने खाली उतरले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दहा ते पंधरा मिनिटानंतर पेंटाग्राम खाली करण्यात आला. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तांत्रिक बिघाड झाल्यानंतर रेल्वे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले.

नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती. लोकल दादर रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर लोकलच्या पेंटाग्राममधून ठिणग्या उडल्या. या पेंटाग्राममधून ठिणग्यांचा आवाज येऊ लागला. यामुळे रेल्वेमधील प्रवासी भयभीत झाले. पेंटाग्राममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कळताच लोकलमधील प्रवासी डब्यातून बाहेर आले. रेल्वे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने प्रवाशांना दूर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

SCROLL FOR NEXT