अंगठी गिळलेल्या नवजात बालकाला सर्जरीनंतर जीवनदान...! रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

अंगठी गिळलेल्या नवजात बालकाला सर्जरीनंतर जीवनदान...!

नुकत्याच जन्मलेल्या चिमुकल्याने एक ग्रॅमची सोन्याची आंगठी गिळल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये डॉ. किरण शिंदे यांनी दुर्बिणीद्वारे सर्जरी करुन चिमुकल्याने गिळलेली अंगठी पोटातुन सुखरुप बाहेर काढल्याने बाळ सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे - देव तारी त्याला कोन मारी...! असं म्हणतात त्याच्याच प्रत्येय दौंड Dound तालुक्यातील केडगावात Kedgaon आला आहे. नुकत्याच जन्मलेल्या चिमुकल्याने एक ग्रॅमची सोन्याची आंगठी गिळल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये डॉ. किरण शिंदे यांनी दुर्बिणीद्वारे सर्जरी करुन चिमुकल्याने गिळलेली अंगठी पोटातुन सुखरुप बाहेर काढल्याने बाळ सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

दौंड तालुक्यातील केडगाव येथील पल्लवी रोहित शेळके या महिलेची प्रस्तुती खाजगी रुग्णालयात झाली होती. याचदरम्यान ग्रामीण प्रथेप्रमाणे नवजात बाळाच्या ओठावर आणि जिभेला सोने चाटविण्यात आली.

त्यानुसार 4 ते 5 महिलांनी आळीपाळीने सोन्याची अंगठी बाळाच्या जिभेला लावली याच दरम्यान बाळाने ती अंगठी गिळली. नुकत्याच जन्मलेल्या बाळाने अंगठी गिळल्याने बाळाच्या जिवाला धोका होण्याची भिती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. मात्र पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये तातडीने सर्जरी झाल्याने बाळाच्या पोटातील अंगठी बाहेर काढल्याने बाळ बचावले आहे.

म्हणुनच म्हणतात ना मुलं ही देवा घरची फुलं असतात. म्हणुनच देवाच्या रुपात डॉक्टरांना आपलं कर्तव्य पार पाडत चिमुकल्याचा जीव वाचवला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

High Speed Train: १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात; हाय स्पीड ट्रेनने प्रवास होणार सुसाट

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

SCROLL FOR NEXT