Badlapur Leopard News Saam tv
मुंबई/पुणे

Leopard : मुंबईच्या वेशीवर बिबट्याची दहशत, बदलापूरच्या रस्त्यांवर दिसला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Badlapur Leopard News : बदलापूरच्या आंबेशीवनंतर आता कराव गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • बदलापूर परिसरात बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीती

  • आंबेशीवनंतर कराव गावातही बिबट्याचा वावर

  • रात्री रस्त्यालगत बिबट्या दिसल्याने खळबळ

  • वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

  • नाशिकमध्येही सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर कैद

राज्यात सर्वत्र बिबट्याची दहशत असून आता बदलापूरमध्ये देखील बिबट्याचे दर्शन झाले आहे. बदलापूर जवळच्या आंबेशीव गावात बिबट्याची दहशत पसरलेली असतानाच आता वांगणी जवळच्या काराव गावातही बिबट्या दिसल्याने खळबळ उडालीय. रात्रीच्या सुमारास काराव-बदलापूर रस्त्यालगत बिबट्या दिसून आल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे.

काल म्हणजेच सोमवारी कारावमधील ग्रामस्थ विलास देशमुख कारने आपल्या घरी येत असताना त्यांना या बिबट्याचं दर्शन झालं. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना तत्काळ याची माहिती दिली आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काराव गावात बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला कळवण्यात आली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

याआधी गेल्या आठवड्यात बदलापूरच्या आंबेशीव गावात दोन बिबटे आले असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यात वनविभागाला यश आलं नाही. आता तिथलाच बिबट्या कराव गावात आलाय का? अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये होते आहे.

नाशिकच्या रस्त्यांवर फिरतोय बिबट्या

नाशिकमध्ये देखील बिबट्याचा वावर वाढलेला पाहायला मिळाला आहे. नाशिक येथील जेजुरकर मळ्यातील लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाला. रात्रीच्या सुमारास हा बिबट्या लॉन्सच्या बाहेर बसून एखाद्या पाहरेकऱ्याप्रमाणे नजर ठेवून पहारा देत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गावात बिबट्याच्या येण्या जाण्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chronic kidney disease: किडनीचा आजार झाला म्हणजे डायलिसिस निश्चित? 'हे' ५ गैरसमज आताच दूर करा

Latest New Mangalsutra: काळ्या मण्यांचा 'हा' लूक होतोय प्रचंड व्हायरल, पाहा मंगळसूत्राचे ६ सर्वात सुंदर डिझाईन्स

Weight Loss Tips: कमी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी

Raigad Crime: रायगड हादरले! १७ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT