leopard at kalyan Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

leopard at kalyan : कल्याण-डोंबिवलीकरांनो आता सावध राहण्याची गरज आहे. कारण ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री झाली आहे. यामुळे नागरिक दहशतीत आहेत.

Vishal Gangurde

राज्यात सर्वत्र बिबट्यांचा कहर

बिबट्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आता कल्याण-डोंबिवलीत बिबट्याची एन्ट्री

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्याने कहर माजवला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बिबट्याचे अंगावर काटे उभे राहणारे व्हिडिओ समोर येत आहेत. पुणे, नगरमधील नागरिकांची रात्रीची सुखाची झोप उडवणाऱ्या बिबट्याची कल्याण-डोंबिवलीत एन्ट्री झाली आहे. बिबट्याच्या एन्ट्रीमुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिक दहशतीत असल्याची माहिती मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरातील ग्रामीण पट्ट्यात असलेल्या मंगरूळ गावात बिबट्याचं दर्शन झालं आहे. गावात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

एकीकडे बिबट्याच्या हल्ल्याने महाराष्ट्राच्या काही भागातील लोक बेजार झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर नरभक्षक असलेल्या बिबट्याचं कल्याण-डोंबिवलीतील ग्रामीण भागात दर्शन झालं आहे.

या बिबट्याने हजारो नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बिबट्या कल्याण-डोंबिवलीतील ग्रामीण भागातील नागरिक वनविभागाकडे या बिबट्याला पकडण्याची मागणी कत आहेत. तर त्यांनी काही भागात पिंजरे लावण्याची विनंती केली आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी कल्याणच्या ग्रामीण भागातील रोहण -वाहोली परिसरात बिबट्याचा संचार सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. या बिबट्याने परिसरातील भटक्या कुत्र्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर वनविभागाने परिसरात पिंजरे लावले होते.

पुण्यात बिबट्यानंतर काळवीटांची एन्ट्री

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय. त्यातच आता पुण्यातील एनडीए परिसरातील मोकळ्या भागात काळवीट आढळले आहेत. अन्नाच्या शोधात जंगलात राहणारे प्राण्यांची येजा आता थेट शहरात होऊ लागली आहे. पुण्यातील NDA परिसरात बुधवारी हे काळवीट दिसून आले. एनडीए चांदणी चौक ते एनडीए रस्त्यावर चार ते पाच काळवीट मुक्त संचार करताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT