Leopard population in Maharashtra crosses 1,200; forest department plans action to control attacks. saam tv
मुंबई/पुणे

Leopard: बिबट्यांची संख्या 1200 वर; राज्य सरकार बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार?

Leopard Population in Maharashtra: उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या तब्बल 1200 वर पोहोचलीय. 12 हजारहून अधिक पाळीव प्राणी बिबट्यांचे शिकार ठरलेत. त्यातच बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानवी वस्तीत भीतीचं सावट पसरलंय. मात्र आता बिबट्यांचा राज्य सरकार कसा बंदोबस्त करणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या तब्बल १२०० वर पोहोचली आहे.

  • बिबट्यांनी १२ हजारांहून अधिक पाळीव प्राण्यांचा बळी घेतलाय.

  • मानवी वस्तीत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचं सावट निर्माण झालं आहे.

बिबट्याचा वावर थेट शिवाराबरोबरच घरापर्यंत आल्यानं पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत. या भागातील बिबट्यांची संख्या 1200 वर गेली असून आतापर्यंत बिबट्यानं 54 जणांचा बळी घेतलाय तर 5 हजार नागरिकांवर हल्ले केले आहेत. आता अजून किती बळी जाण्याची वाट बघायची असा सवाल करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दुसरीकडे कबुतरांबाबतच्या बैठका थांबवून आमच्या लेकराचा जीव वाचवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केलीय.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारनं थेट बिबट्याच्या नसबंदीचा पर्याय निवडलाय. आणि असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र बिबट्याच्या नसबंदीच्या निर्णयाला वन्यजीव अभ्यासकांनी मात्र आक्षेप घेतलाय. बिबट्या आणि माणसाचा हा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जातोय. बिबट्यांचा आक्रमकपणा नेमका का वाढलाय? याचा विचारही व्हायला हवा.

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या निर्णयानंतर तरी बिबट्यांचा बंदोबस्त होणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidarbha Monsoon : अखेर विदर्भात मान्सून दाखल, पण 'या' तारखेपर्यंत पेरणी करूच नका; हवामान विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा

ऑपरेशन टायगरनंतर एकनाथ शिंदे अन् ठाकरे आमने-सामने; विधानभवनात खडाजंगी

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बडा नेता आज करणार शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: सांगलीत पाऊसासाठी दानम्मा देवीला लोटांगण घालत तुकाराम बाबांचे साकडं

Rule Change : रेल्वे तिकीट ते LPG, १ जुलैपासून बदलणार 7 नियम; थेट तुमच्या खिशावर परिणाम

SCROLL FOR NEXT