Rajiv Gandhi Zoological Museum Saam Digital
मुंबई/पुणे

Rajiv Gandhi Zoological Museum : पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्याने ठोकली धूम, ३६ तासांपासून शोध सुरू; गेला बिबट्या कुणीकडे?

Rajiv Gandhi Zoological Museum Katraj : पुण्यात कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून बिबट्या अचानक गायब झाला आहे. या बिबट्याचा गेल्या ३६ तासांपासून शोध सुरू असून अद्याप बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

Sandeep Gawade

Rajiv Gandhi Zoological Museum

पुण्यात कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून बिबट्या अचानक गायब झाला आहे. या बिबट्याचा गेल्या ३६ तासांपासून शोध सुरू असून अद्याप बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. पहाटे ४:५३ च्या सुमारास बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. अग्निशामक दलासह पुणे, नाशिकची रेस्क्यू टीम,५० सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत.

बिबट्या पळाला होता. प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीच्या बिबट्याने पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून धूम ठोकली आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. दरम्यान आजूबाजूच्या सोसायट्यातील आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

सोमवारी पहाटे हा बिबट्या फरार झाला आहे. ज्या कात्रज भागात राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे त्या भागात मानवी वस्ती आहे. त्यामुळे या भागात खळबळ माजली असून नागरिक दहशतीखाली आहेत. प्रशासनाकडून या भागात पिंजरे कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र ३६ तासांनंतरही बिबट्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. वनविभाग आणि सुरक्षा अधिकारी डोळ्यात तेल घालून बिबट्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT