चेंबूरमध्ये कॅटालिस्ट पावडरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण Saam TV
मुंबई/पुणे

चेंबूरमध्ये कॅटालिस्ट पावडरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या पावडरमुळे शरीरास धोका निर्माण होईल अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

मुंबई : चेंबूरच्या (Chembur) वाशीनाका गव्हाणगावात एचपीसीएलच्या प्लांट मधून मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट या पावडरची गळती झाली आहे. पुर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरलेली पाहायला मिळत आहे. गावात दत्त जयंती निमित्त असलेल्या भंडाऱ्या दरम्यान ही पावडर भाविकांच्या जेवणात गेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या पावडरमुळे शरीरास धोका निर्माण होईल अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. Rcf पोलीस ठाणे, फायर ब्रिगेडची टिम, मनपा अधिकारी यांनी घटनास्थळी गावात येऊन या प्रकणाची चौकशी केली आहे आणि पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. पण एचपीसीएलचा एकही अधिकारी साधी भेट देण्यास किंवा चौकशी करण्यास आले नाहीत. त्या मुळे सर्व नागरिक एचपीसीएल कंपनीच्या या कृत्यावर संतप्त झाले आहेत. कंपनीने माफी मागावी किंवा आम्हाला इथून स्थलांतरीत करावे अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT