कर्नाटकातील घटनेचा महाराष्ट्रातील नेत्यांनी व्यक्त केला जाहीर निषेध Saam TV
मुंबई/पुणे

कर्नाटकातील घटनेचा महाराष्ट्रातील नेत्यांनी व्यक्त केला जाहीर निषेध

त्याचबरोबर कोल्हापुरात कानडी व्यावसायीकांची दुकानं बंद करण्यात आली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाला असून शिवप्रेमी नागरिकांनी रात्री बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात जमून सर्व रस्ते बंद केले. धर्मवीर संभाजी महाराज चौकात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेते तीव्र पडसाद महाराष्ट्रामध्ये पडले आहे. महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेत्यांनाी तिव्र संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात कानडी व्यावसायीकांची दुकानं बंद करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बंगळुरूला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. भाजपा मोदींची तुलना शिवरायांशी करते. चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. शिवरायांच्या नावाचा उपयोग संधीसाधू राजकारणासाठी करायचा आणि महाराजांनाच कमी लेखायचे हा भाजपाचा कट आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. कर्नाटकमधील भाजपा सरकार मराठी भाषिकांवर भयंकर अत्याचार करत आहे. भाजपने आपली भुमिका स्पष्ट करावी. असं ट्विट करत सचिन सावंत यांनी जाहीर निषेध केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT